न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

धर्माची शिकवण देणाऱ्या मिशनरींना पोलिसांनी घेतले ताब्यात, सावंतवाडीतील प्रकार

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

हिंदू संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी शहरातील जगन्नाथराव भोसले उद्यानात विश्रांती घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या धर्माची शिकवण देणाऱ्या मिशनरींना आज चौकशीसाठी ताब्यात घेतले. सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू आहे. हे मिशनरी गोवा राज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
गेले आठ दिवस हे प्रकार सुरू असल्याचे समजते. उद्यानात हा प्रकार सुरू असताना एका महाविद्यालयीन युवकांने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोन केला. तसेच त्या प्रकाराचे छायाचित्रण करायला सुरुवात केली. त्याबरोबर त्या मिशनरींनी तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले. या प्रकारानंतर पोलिसांना पाचारण करीत त्यांना ताब्यात देण्यात आले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच हिंदू समाजातील नागरिकांनी अशा मिशनरीन पासून दूर राहावे. तसेच हे प्रकार सुरू असल्यास पोलिसांना तसेच हिंदू संघटनांना संपर्क साधावा असे आवाहन बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे