कार्यकर्त्यांची नस जाणणारा नेता हरपला ….. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.केसरकर यांची अजित पवार यांना श्रद्धांजली
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
प्रशासनावर उत्तम पकड असलेला, कार्यकर्त्यांची नस जाणणारा व राज्याचे राजकारण नेहमी स्वतःभोवती फिरवत ठेवणारा नेता हरपला अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू धक्कादायक व मन सुन्न करणारा आहे. त्यांची अकाली एक्झिट कोणाला न पटणारी आहे. अजितदादा पवार यांचा संपूर्ण प्रशासनावर वचक होता. त्यांच्या कामाची पद्धत देखील निराळी होती. अगदी पहाटे पासून ते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असत. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात फार मोठी उणीव निर्माण झाली असून अजितदादा पवार यांच्याशिवाय राज्याचे राजकारण पुढील काही वर्षे तरी बेचव झालेल दिसेल. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांनी व्यक्त केली आहे.


