नवी मुंबईतील तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडमध्ये भीषण आग
नवी मुंबई|
नवी मुंबईतील तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडमध्ये भीषण आग लागली असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
आग इतकी तीव्र आहे की तिचा धूर अनेक किलोमीटरपर्यंत पसरला, त्यामुळे आसपासच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून गेल्या दोन तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाचं म्हणजे सुमारे 15 दिवसांपूर्वीही याच ठिकाणी आग लागली होती, त्यामुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.”


