पत्रकार व कडवा शिवसैनिक आम्ही गमावला …. उत्तम वाडकर यांना शोकसभेतून श्रध्दांजली
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सर्वांच्या प्रसंगाला नेहमी धावून जाणारा कडवट शिवसैनिक उत्तम वाडकर उर्फ बापू आज आपल्यात नाही. शिवसैनिक म्हणून उत्तम वाडकर यांचे जेवढे कार्य होते तेवढेच कार्य त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केले. त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य प्रत्येकाने अनुभवला होता. शिवसेना त्याने खेडोपाडी पोहोचवली. ग्रामीण भागात त्याना मानणारा मोठा वर्ग होता. ते त्याच्या सुखदुःखात नेहमीच बरोबर असायचे अशा शब्दांत अनेकांनी आज सोमवारी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
वाडकर यांचे अलिकडेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सावंतवाडीतील पत्रकार व शिवसैनिक याच्या उपस्थितीत सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आज सायंकाळी शोकसभा पार पडली.
या शोकसभेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, उध्दव सेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, समीर वंजारी, सुधीर पराडकर, संदीप टोपले, रमेश गांवकर, सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, सीमा मठकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, उदय पारिपत्ये, राम वाडकर, विलास जाधव, महेश पांचाळ, रेमी आल्मेडा, प्रमोद सावंत, रश्मी माळवदे, शितोळे, निशांत तोरसकर, राकेश परब, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, अनंत जाधव, सचिन रेडकर, रूपेश हिराप, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, शैलेश मयेकर, प्रसाद माधव, संदेश पाटील, निखील माळकर आदि उपस्थित होते.
वाडकर हे सर्व क्षेत्रात पारंगत व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्या काळात एक शिवसैनिक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास जिंकला होता. त्यांच्या मनावर बाळासाहेबांबद्दल अतूट असे प्रेम निर्माण झाले होते. त्या प्रेमापोटी त्यांनी सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात शिवसेना विस्तारण्याचे काम केले. गावागावात जाऊन शिवसैनिक घडवले. त्यांच्यातील अनेक वेळा कडवट शिवसैनिक आम्ही पाहिला आहे. नेहमीच अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी ते शिवसैनिकांच्या पाठीशी राहायचे शिवसैनिकांचे मनोबल उंचवायचे एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असायचा असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
वाडकर यांना पत्रकारिता क्रीडा सामाजिक क्षेत्राबद्दल नेहमीच आस्था असायची ते वेगवेगळ्या विषयावर बोलायचे असे ही उपस्थितांनी सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, समीर वंजारी, रमेश बोंद्रे, चंद्रकांत कासार, अभिमन्यू लोंढे, सुरेश भोगटे, सुधीर पराडकर, रूपेश राऊळ, रमेश गांवकर, गजानन नाईक, संदीप टोपले, प्रा. रूपेश पाटील, विनायक गावस यांनी शोकसभेत वाडकर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.


