न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील जळीतग्रस्त व्यावसायिक निपाणीकर यांना चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून आर्थिक मदत

 सिंधुदुर्ग / राजू तावडे 

सावंतवाडीतील श्री. संजीव गणपत निपाणीकर (रा. सावंतवाडी दरवाजा) यांच्या बाजारपेठेतील दुकानाला भीषण आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटाच्या काळात समाजाची बांधिलकी जपत, ‘सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी)’च्या वतीने त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
दुकानाला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत, मंडळाचे सचिव श्री. जगदीश चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांना श्री. निपाणीकर यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सावंतवाडी तालुक्यातील समाजबांधवांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली.
यामध्ये विशेषतः नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी १०,००० रुपये, श्री. विजय चव्हाण यांनी ५,००० रुपये आणि श्री. रवीकिशोर चव्हाण यांनी ५,००० रुपयांची भरघोस मदत केली. यासोबतच इतरही समाजबांधवांनी आपापल्या परीने आर्थिक योगदान दिले. जमा झालेली एकूण ३३,५०० रुपयांची रक्कम श्री. संजीव निपाणीकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या उपक्रमातून संघटनेने समाजातील एकता, बंधुभाव आणि आपुलकीचे दर्शन घडवून आणले आहे.
या मदत वाटप प्रसंगी सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सिंधुदुर्ग चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) चे अध्यक्ष श्री. विनायक चव्हाण, सचिव श्री. जगदीश चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सहसचिव श्री. बाबुराव चव्हाण, माजी अध्यक्ष श्री. गणेश म्हापणकर, श्री. दिलीप इन्सुलकर, श्री. विजय चव्हाण, मार्गदर्शक श्री. लक्ष्मण आरोसकर, श्री. रवीकिशोर चव्हाण, श्री. नरेश कारीवडेकर आणि श्री. दिनेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे इतर सभासद व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि संकटसमयी सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे सचिव श्री. जगदीश चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच, भविष्यातही संघटना आणि समाजबांधवांसाठी असेच सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे