न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सर्वोदयनगर येथील नागरिकांची नगरपरिषदेत धडक … कामे पूर्ण न झाल्यास १ मे रोजी उपोषण

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सर्वोदयनगर येथील नागरिकांनी आज सोमवारी सावंतवाडी नगरपरिषदेत धडक देत विविध नागरी समस्यांकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
सर्वोदयनगर परिसरातील गंभीर व दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. परिसरात पाण्याच्या पाईपलाईन तसेच गॅस पाईपलाईन साठी वारंवार रस्ते खोदण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर २ महिने झाले तरीही रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली असून खड्डे, उंच-सखल भाग व धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर मुख्याधिकारी म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांचे खडीकरण करण्यात येईल, टेंडर प्रोसेस झालेली आहे. नगरसेविका निलम नाईक यांनी याबाबत नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांचे लक्ष वेधले.
येथील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात माती व कचरा साचलेला असून त्यांची नियमित साफसफाई करावी. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. भविष्यात पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते. याशिवाय, विजेच्या तारांचे, इंटरनेट सुविधांचे अस्ताव्यस्त जाळे अनेक ठिकाणी दिसून येते ज्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, ॲलर्जी व इतर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच येत्या ३० एप्रिलपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास १ मे रोजी शांततामय मार्गाने लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी गुरूदत्त कामत, दिक्षा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर आदींसह सर्वोदय नगर येथील नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे