कुणकेश्वर महापुजा जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसेंसह आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न
सिंधुदुर्ग/
श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये यावर्षी प्रथम पूजेचा मान सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना देण्यात आला. मध्यरात्री जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे व आमदार दिपक केसरकर यांच्याहस्ते शासकीय पुजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हणून मानलं जातं कोकणच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची पर्वणी असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितलेय”


