न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आचार्य बालकृष्णजींच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत 4 ऑगस्ट पासून निःशुल्क फिटनेस योग शिबिर*

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र_ यांच्या वतीने _आचार्य बालकृष्णजी_ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व नागरिकांसाठी _निःशुल्क फिटनेस योग शिबिराचे_ आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर मंगळवार दि. _4 ऑगस्ट 2026_ पासून सावंतवाडी येथे सुरू होणार आहे. दैनंदिन जीवनातील तणाव, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार कमी करून शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यासाद्वारे निरोगी जीवन जगता यावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

या शिबिरात अनुभवी योगशिक्षकांकडून आसने, प्राणायाम, ध्यान आणि योगोपचार यांचे मोफत मार्गदर्शन दिले जाईल. औषधी वनस्पती चे फायदे देखील सांगण्यात येणार आहेत. पुरुष, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी हे शिबिर खुले आहे.

इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क: _श्री. शेखर बांदेकर – 9823881712 श्री नारायण सावंत 9423320473_
सर्व योगाभ्यास प्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

*🕉️ निःशुल्क फिटनेस योग शिबीर 🕉️*

 

*आयोजक: नगरपरिषद सावंतवाडी, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन, महाराष्ट्र*

 

📅 *दिनांक:* मंगळवार, दि. 4 ऑगस्ट 2026 पासून दररोज

⏰ *वेळ:* सकाळी 5:30 ते 7:30

👨‍🏫 *योग मार्गदर्शक:* श्री. शेखर बांदेकर

📍 *स्वरूप:* Online + सावंतवाडी योगवर्ग offline

 

*घरबसल्या Online योग करा!*

 

*Google Meet Link:*

https://meet.google.com/gvm-huuk-itw

 

*महत्वाच्या सूचना:*

1. वरील Link चा वापर फक्त *आज 4 ऑगस्ट* साठी आहे.

2. दररोज नवीन Link दिली जाईल. कृपया रोजची नवीन Linkच वापरावी.

3. वेळेवर Join व्हा आणि नोटबुक-पेन सोबत ठेवा.

 

सर्वांनी या आरोग्यदायी संधीचा लाभ घ्यावा.

 

संपर्क: श्री. शेखर बांदेकर – 9823881712

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे