न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबईत बोगस व्यक्तींना ‘पोलिस कर्मचारी’ दाखवून पगार खाऊन शासनास लुबाडले

मुंबई / वृत्तसंस्था

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतून नव्या प्रणालीत (System) ट्रान्सफर करताना या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. येथील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी जे लोक पोलिस दलातच नाहीत, अशा ८ ते १० बोगस व्यक्तींना ‘पोलिस कर्मचारी’ म्हणून दाखवले. केवळ इतकेच नाही, तर त्यांच्या नावावर बँक खाती उघडून शासनाकडून त्यांचे नियमित पगारही काढले.”

या सर्व प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचे ऑडिट (लेखापरीक्षण) केले. या ऑडिटमध्ये पगाराच्या रकमेत मोठी तफावत आढळली. ज्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पगारापोटी जमा झाले, त्यांची नावे तपासली असता ते कोणीही पोलिस दलात कार्यरत नसल्याचे सिद्ध झाले.”

तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून हे पगार काढले जात होते. हे लोक नेमके कोण आहेत आणि त्यांचे या अधिकाऱ्यांशी काय संबंध आहेत, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे