न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्ष जयंती निमित्त कोमसाप तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन: तालुका अध्यक्ष पटेकर

सिंधुदुर्ग /राजू तावडे

  हे वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जन्म वर्ष जयंती असून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्याचप्रमाणे तुतारी काव्य संमेलनासह विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करून साहित्य चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जातील, असे अभिवचन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखाध्यक्ष दिपक पटेकर यांनी दिले.

‍कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवारी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात पार पडली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला क्रांती दिनानिमित्त देशासाठी हुतात्मात्व पत्करलेल्या वीराना अभिवादन करण्यात आले. यावेळी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०२५ – २०२६ या आर्थिक वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षात झालेल्या जमाखर्चास मान्यता देण्यासह पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, साहित्य संमेलनांसह दरवर्षी होणारे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.‌

याप्रसंगी जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, सौ. उषा परब, प्रा. सुभाष गोवेकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुस्मिता चव्हाण, विजय देसाई, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, अभय नेवगी, संतोष पवार, प्रा. गणपत शिरोडकर, ॲड.अरूण पणदूरकर, प्रा.एस. एन. मुक्कनवार, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर, मीरा कासार आदी उपस्थित होते.

यावेळी वार्षिक सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम वाचन मंदिरचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे