आंबोलीत सर्पदंशाने होस्पेटमधील पर्यटकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग/राजू तावडे
आंबोली धबधबा येथे सर्पदंश झालेल्या हॉस्पेट येथील ३८ वर्षीय पर्यटकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. गंगाधर मरप्पा असे मृत पर्यटकाचे नाव आहे.
हॉस्पेट येथून काही पर्यटक आंबोली धबधबा येथे पर्यटनासाठी आले होते. मुख्य धबधब्याच्या परिसरात आंघोळ करत असताना गंगाधर यांना अचानक सापाने दंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे पुढील उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.


