न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मंत्री सुभाष फळदेसाई हे आपले वैयक्तिक शत्रू नसून, आपण दोघेही चांगले मित्र आहोत..दामू नाईक यांचा दावा

पणजी /वृत्तसंस्था

भारतीय जनता पक्षांतर्गत राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील नाराजीच्या चर्चांवर भाजपचे ज्येष्ठ नेते दामोदर (दामू) नाईक यांनी भाष्य करत पक्षात सलोखा असल्याचे स्पष्ट केले. मंत्री सुभाष फळदेसाई हे आपले वैयक्तिक शत्रू नसून, आपण दोघेही चांगले मित्र आहोत, असा ठाम दावा दामू नाईक यांनी केला. समाजासाठी आणि पक्षासाठी काम करताना अंतर्गत मत-मतांतरे असू शकतात; मात्र भाजपला पुढे नेण्यासाठी सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणे हेच आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाच्या प्रक्रियेवरून तसेच उमेदवारीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेबाबत बोलताना दामू नाईक यांनी सांगितले की, ST आरक्षणाची कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया योग्य दिशेने सुरू आहे. पक्षाचे स्थानिक आमदार आणि संबंधित सदस्यांनी या प्रक्रियेचे पूर्ण स्वागत केले आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्या विजयासाठी प्रामाणिकपणे आणि जीवाची बाजी लावून काम करण्याची तयारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ असलेला कोणताही खरा कार्यकर्ता अचानक उचकून जाणारा नसतो. तो ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची शिस्त पाळतो आणि संघटनेच्या हितासाठी काम करतो, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, आज सकाळी सांगामध्ये मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी जात दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. या पार्श्वभूमीवर पक्षातील शिस्त तसेच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.

 

कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसांत विशेष बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता असून, या बैठकीत सर्व संबंधित विषयांवर आमनेसामने बसून सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

भाजप हा केवळ एका व्यक्तीचा नसून संघटित विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षांतर्गत कोणतीही अडचण किंवा मतभेद आपापसांत चर्चा करून सोडवले जाऊ शकतात. कार्यकर्त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

 

पक्षातील मतभेद चर्चेतून सोडवले जातील आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले जाईल, असा विश्वासही दामू नाईक यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे