मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू…
रत्नागिरी/ प्रतिनिधी
अखेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आली. कशेडी बोगद्यानजीक दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक सोमवारी दुपारनंतर आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून येथील माती आणि दगड बाजूला केले असून, कशेडी घाटात सध्यातरी एकेरी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.सध्या मुंबईच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कशेडीत दरड कोसळली होती.


