न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हाहाकार…. साता-यात शाळेचे छप्पर उडून गेले… पुणे नाशिक महामार्ग ८ तास बंद… आळंदीत ४०० वारक-यांची सुटका… राज्यातील परिस्थितीचा आढावा….

मुंबई/ वृत्तसंस्था

राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. सातारा जिल्ह्यातील सज्जनगड पायथ्याशी असलेल्या गावातील शाळेचे छप्पर उडून गेले असून मुंबई गोवा, पुणे नाशिक महामार्ग ८ तासांहून अधिक काळ बंद आहे.आळंदीत नदीत अडकलेल्या ४०४ वारक-यांची सुटका करण्यात आली आहे. तर पुणे पोलीस मुख्यालयात पाणी शिरले होते.

इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार पायऱ्यांना देखील लागले पाणी. पुरात अडकलेल्या ४०४ वारक-यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

उरण तालुक्यातील जनतेला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तालुक्यात हाहा:कार माजला आहे. संपूर्ण तालुक्याला पाण्याने वेढले असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यात सोमवारी सकाळी जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनल येथील जहाजवरून चक्रीवादळात कंटेनर उडाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार उडाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पळसदरी येथे पहाटे अडीच वाजता दरड कोसळली. पळसदरी ते खोपोली रेल्वे ट्रॅक खचून गेलेला आहे. पळसदरी ते खोपोली रेल्वे सेवा बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई दिशेने जाणारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

शहरात 24 तासात 18.6 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊसजवळ रस्ता खचल्यामुळे त्या खड्ड्यात ट्रक फसला आहे.

पुणे नाशिक महामार्ग बंद करण्यात आला ‌.चाकणजवळ पाणी आल्याने महामार्ग आठ तासांहून अधिक काळ बंद आहे.

सातारा जिल्ह्यातील सज्जनगड जवळील कारी गावातील जि.प. शाळेचे छप्पर उडून गेले.त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे