न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूर जिल्ह्यात नवा पर्यटन पॉईंट सापडला… रक्षादेवी घाटात सापडला “मॅग्नेटिक पॉइंट’

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

लेह लडाख येथे असलेल्या मॅग्नेटिक पॉइंट’ सारखा पॉईंट कोल्हापूर जिल्ह्यात आढळला आहे. भुदरगड तालुक्यातील खेडगे-एरंडपे मार्गावरील रक्षादेवी घाटातील उतारावर उभी करून न्यूट्रल केलेली चारचाकी गाडी उताराच्या दिशेने न जाता चढाच्या दिशेने आपोआप सरकत असल्याचा अनुभव समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात ‘मॅग्नेटिक पॉइंट’ असल्याची चर्चा रंगू लागली असून, या रहस्यामागील कारण जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागाला राधानगरी तालुक्याशी जोडणाऱ्या खेडगे-एरंडपे मार्गावरील रक्षादेवी घाटात, खेडगे गावापासून काही अंतरावर रस्ता खचलेल्या ठिकाणाजवळ नितवडेकडे जाणाऱ्या फाट्यानजीक हा अनोखा स्पॉट आढळला आहे.

खानापूर येथील संदीप पाटील यांना सर्वप्रथम या ठिकाणी हा अनुभव आला. त्यांनी चारचाकी वाहन न्यूट्रल केल्यानंतर गाडी उताराऐवजी चढाकडे वेगाने सरकू लागल्याचे पाहिले. खात्री करण्यासाठी त्यांनी सात-आठ वेळा प्रयोग केला आणि प्रत्येक वेळी तोच अनुभव आला

भुदरगड तालुक्यातील ऐतिहासिक गडकोट, संतांच्या संजीवन समाधी, सवतकडा व नाईकवाडी धबधबे, पाटगाव धरण आणि निसर्गसंपन्न वनराई ही पर्यटनस्थळे आधीच प्रसिद्ध आहेत. आता या ‘मॅग्नेटिक पॉइंट’ची भर पडल्याने भविष्यात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सौ.लोकमत
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे