न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कळसुलकर शाळेत शनिवारी वासंतिक वर्गाचे आयोजन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती, सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे शनिवार २५ एप्रिल ते बुधवार २९ एप्रिल पर्यंत वासंतिक वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे पाच दिवशीय हा वासंतिक वर्ग सकाळी ९ ते १०.३० या वेळेत दररोज दिड तास सुरू राहणार आहे.
कार्यक्रमासाठी सौ. नेहा पुराणिक (सावंतवाडी विकास खंड मुख्य संयोजक) यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.
या पाच दिवशिय वासंतिक वर्गात प्रमुख मार्गदर्शक सौ. दुहिता साखळकर देशपांडे (एम. ए. संस्कृत बी.ए. संस्कृत) विद्यार्थ्यांना संस्कृत विषयी काही अतिशय उपयुक्त स्तोत्रे व सुभाषिते यांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच वासंतिक वर्ग पुस्तिकेचे पूर्ण पाठांतर करण्यात येणार आहे. या वासंतिक वर्गाच्या माध्यमातून संस्कृतचा प्रसार व प्रचार होणार असुन यात सर्वांनी सहभागी व्हावेत असे आवाहन सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती आणि सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पै आणि सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे