न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंदोलकांना देशभरातून स्विगी ,झोमॅटोवरून अन्नाचा पुरवठा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आंदोलनाला आता देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातील लोकं स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून या आंदोलकांच्या जेवणाची सोय करत आहेत. हे लोक स्विगी, झेमॅटोवरून जेवण ऑर्डर करत आहेत, आणि हे ऑर्डर केलेलं जेवणं जंतरमंतरमध्ये आंदोलासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना नेऊन देण्यास सांगत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. यावरून या आंदोलनाला देशभरातून किती मोठा पाठिंबा मिळत आहे हे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे दिल्लीमधील स्थानिक नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. जंतर मंतरवर लंगर सुरू करण्यात आला आहे. ज्यांना जे शक्य आहे, ते अन्नपदार्थ घेऊन नागरिक जंतर मंतरवर येत आहेत, स्थानिक लोकांकडून विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. सोमवारी घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आंदोलकांना होणाऱ्या मदतीचा ओघ वाढल्याचं दिसून येत आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे