न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत गुरुवारी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी तालुका व्यापारी उद्योजक व व्यावसायिक संघ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार दिनांक २३ जुलै रोजी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. नगरपालिका इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ.नाथ पै सभागृहात दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला श्री.अकुंश जोगदंड, पुणे, खाद्यपदार्थ तज्ञ अन्न पदार्थ सल्लागार आणि प्रशिक्षक हे मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व प्रकारचें खाद्यपदार्थ विक्रेते व्यावसायिक तसेच किराणा, हाॅटेल, खानावळ, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, स्टॉल, मासे, चिकन,अंडी, मटन विक्री करणारे, दुध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण तयार करणारे भट्टि, वडापाव, समोसा भजी, चहा विक्रेता, आणि कॅटरिंग व्यावसायिक, वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यापासून पिठे तयार करणारे, पाणी बाॅटल व पाणी विक्री करणारे व्यावसायिक यांनी प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रमात सहभागी व्हावे. सदर शिबिरात सुरक्षित अन्न, प्रमाणपत्र, तज्ञ मार्गदर्शक , आरोग्य संरक्षण, इत्यादी विषयांवर चर्चा मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी संबंधित व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांनी कार्यक्रमाह उपस्थित राहावे असे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.जगदिश मांजरेकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे