न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विद्यार्थ्यी लाठीचार्ज… गुजरात मध्येही संताप… गुजरात समाचार ने तर ‘क्रुर लाठीचार्ज ‘ मथळ्याखाली बातमी छापली

अहमदाबाद/ वृत्तसंस्था

विद्यार्थ्या लाठीचार्ज वर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुळ भाजपाचे नेत्यांनी निंदा केली आहे..तर गुजरात मिडीयानेही आक्रमक बातम्या छापल्या आहेत. देशातील एक अग्रगण्य दैनिक गुजरात समाचार नेही क्रुर लाठीमार असा उल्लेख करीत बातमी छापली आहे.

चलो संसद’ आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि युवकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. अनेक आंदोलक जखमी झाले असून काहींना ताब्यात घेण्यात आले.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध करत सरकारवर लोकशाही दडपण्याचा आरोप केला आहे. तर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे