युवासेना सावंतवाडी उपतालुका प्रमुख पदी मोईन खान यांची निवड
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा येथील शिंदे गट युवा सेना पक्षाचे धडाडीचे पदाधिकारी मोईन फिरोज खान यांची आज सोमवारी सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. मोईन खान यांनी मागील काळात केलेले कार्य पाहता त्यांना सदर निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मोईन खान, सैफान खान, कैफ शेख हर्षल कल्याणकर, भावेश शेटकर, सतवीर शेखावत, दिव्यम सावंत यांसह युवा सेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आपल्यावर टाकलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे नवनियुक्त युवा सेना तालुकाप्रमुख मोईन खान यांनी सांगितले.


