न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विषबाधा… बुलढाण्यात तीन मुलांचा मृत्यू तर आई आणि एक मुलगा गंभीर

बुलढाणा/ प्रतिनिधी

बुलडाण्यात हृदयद्रावक घटना घडली. आईसह चार मुलाना विषबाधा झाली होती. या घटनेत ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवर देखील सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.”
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई आणि एका चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्षे), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७ वर्षे) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८ वर्षे) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४ वर्षे) आणि अश्मिरा वसीम जमदार (वय ३ वर्षे) यांच्यावर बुलडाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे