नांदगावमध्ये बाहेरील फिरत्या विक्रेत्यांना मनसे ने हाकलले!.. व्हिडिओ पहा
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून नांदगाव परिसरात दुचाकीला खुर्च्या बांधून गावोगावी फिरणाऱ्या काही बाहेरील व्यक्तींच्या रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये चर्चा आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून आज मनसेने त्यांचा शोध घेऊन हाकलून लावलं आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन व्यवसाय करायचा असेल तर आवश्यक कागदपत्रे, ओळख व स्थानिक प्रशासनाची परवानगी असणे गरजेचे आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत यांनी या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिला पाहिजे आपल्या गावात कोण फेरीवाले येत आहेत आणि कोण नाही असे भय्या येणार आणि चोरी करून जाणार नंतर आपण रडत बसणार हे अयोग्य आहे.


