गॅस टंचाई… चुली पेटल्या… आणि वनविभाग सतर्क झाला… जंगलात बंदोबस्त वाढला
रत्नागिरी/ मेघेश मोंडकर
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. भारतालाही त्याची झळ पोचली असून अनेक उद्योग, हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. अशातच गॅस टंचाई निर्माण झाली असल्याने लोकं चुलीकडे वळले आहेत. मात्र चुलीला लागणारी सुकी लाकडे हि जंगलात मिळत असल्याने आता वनविभाग सतर्क झाला असून वनविभागाने जमिनीवर पडलेल्या लाकडांना नेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
गॅस टंचाई मुळे सध्या इलेक्ट्रिक शेगडी, चुली यांना मोठी मागणी होत आहे. इलेक्ट्रिक शेगड्या वीज बील वाढविणा-या असल्याने चुलींचा वापर होत आहे.मात्र या चुलींना लाकडाची गरज असून ती गरज जंगल भागवतं. मात्र या जंगलातील लाकूड नेण्यास बंदी असल्याने यक्षप्रश्न उभा टाकत आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाही सतर्क झाला असून जंगलात कसून पाळत ठेवत आहे. तर वनविभागाने जमिनीवर पडलेल्या लाकडांना नेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


