न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉर्ट सर्किट

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील आतील भागातील अनेक उपकरणे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, आरोग्य केंद्राच्या आतील भागातील विद्युत वाहिनीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग एवढी भीषण होती की आतील अनेक वीज उपकरणे जळून खाक झाली, तसेच भिंतीही आगीच्या धुराने काळवंडून गेल्या आहेत.

ही आग सकाळच्या सत्रात, रुग्ण तपासणीच्या वेळी लागली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, आग मध्यरात्री लागल्याने आरोग्य केंद्रात रुग्ण अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे