न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मालवणात मच्छीमारी पात उलटून दोघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

मालवण येथील खडकाळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘सागरीका’ (आयएनडी एमएच ५ एमएम १४४४) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी व मच्छीमार सन्नेप सुरेश परब (४१) आणि अक्षय हनुमंत राणे (३०) यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत सुयोग सन्नेप परब (२२) हा तरुण बचावला असून, स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, सन्नेप परब, अक्षय राणे आणि सुयोग परब हे तिघे ‘सागरीका’ या मासेमारी पातीने किल्ले सिंधुदुर्गलगतच्या समुद्रात गेले होते. सकाळी सातच्या सुमारास किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या खडकाळ भागात अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे त्यांची पात समुद्रात पलटी झाली. पात उलटल्याने तिघेही समुद्रात फेकले गेले.

दरम्यान, स्थानिक मच्छीमारांनी तातडीने मदतकार्य करत सुयोग परब याला सुखरूप बाहेर काढले. मात्र सन्नेप परब आणि अक्षय राणे यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे