न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देवगड अणूऊर्जा प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांचे विधान गोंधळात टाकणारे, डॉ. जयेंद्र परुळेकर

 

सिंधुदुर्ग राजू तावडे

कालच पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवगड येथे प्रस्तावित अणूऊर्जा प्रकल्पासंदर्भात गोंधळात टाकणारे विधान केले आहे. ते जाणीवपूर्वक केले आहे की अजाणतेपणी केले आहे हे कळू शकत नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
“देवगड मध्ये कुठलाही प्रदूषणकारी प्रकल्प येऊ देणार नाही, देवगड येथील आंबा बागायतीला तसेच मासेमारीला धोका होईल असा प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही” अशी असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना हि देवगड येथे कुठलाही प्रकल्प येत असल्याची सूचना नाही, तरीही विरोधकांनी राळ उठवायला सुरुवात केली आहे, असे वक्तव्य देखील त्यांनी केले.
केंद्र सरकारने गेल्या हिवाळी अधिवेशनात SHANTI नावाचे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर केलेले आहे. त्यानुसार आता अणूऊर्जा प्रकल्पांचे खासगीकरण होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर एक दोन नव्हे तर चार खासगी अणूऊर्जा प्रकल्पांसाठी MoU वेगवेगळ्या उद्योग समूहांबरोबर केलेले आहेत.
अदानी, अंबानी, बजाज आणि NTPC या उद्योगसमूहांसोबत बारसू, पुर्णगड आणि देवगड (चौथी जागा जाहीर केलेली नाही) येथे खासगी तत्त्वावर अणूऊर्जा प्रकल्प होणार आहेत. असा दावा डॉक्टर परुळेकर यांनी केला आहे.
देवगड येथील प्रकल्प हा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीतर्फे होणार आहे. एवढं असूनही पालकमंत्री असा कुठलाही प्रकल्प होण्याची अजिबात सूचना नाही असे जनतेला का सांगत आहेत हे अनाकलनीय आहे.
७२०० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प देवगड येथे होणार आहे अशी माहिती सर्व इंग्रजी प्रेसने हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिलेली होती. देवगड, जैतापूर, बारसू, पुर्णगड असे एकामागोमाग एक अणूऊर्जा प्रकल्प पुढील काळात उभे राहिले तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर जवळपास ३० हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे