विशाल परब यांच्याकडून मळेवाड, शिरोडा, रेडी गणपती मंदिर येथे छत्र्यांचे वाटप
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आज शनिवारी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर अशा तीन ठिकाणी लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसामध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देण्याऱ्या या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे.
पावसाळ्यात व्यापार सुरू ठेवण्यासाठी छत्री ही केवळ एक वस्तू नसून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला आधार देणारे संरक्षण कवच ठरते. हीच जाणीव ठेवून विशाल परब यांनी व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि त्यांच्या संघर्षात खंबीरपणे सोबत उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी मळेवाड तिठा येथे विशाल परब यांच्यासह सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, जि. प. सदस्या सौ. अपर्णा सातोसकर, ओंकार प्रभू, माजी जि. प. सदस्य राजन मुळीक, विकास परब, केतन आजगांवकर, गिरिष परब, बंड्या दळवी, बंटी जामदार, विजू साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर तर रेडी येते सरपंच श्री. रामसिंग उर्फ भाई राणे,उपसरपंच आनंद भिसे, ग्रामपंचायत सदस्य नमिता नागोलकर, रश्मी रेडकर, सागर रेडकर, सामाजिक कार्यकर्ते सागर राणे, दीपक राणे, दिलीप राणे, दर्शन कांबळी, संजय कांबळी, विनायक कांबळी, शिरोडा बाजारपेठ येथे माजी सरपंच मनोज उगवेकर, लक्ष्मीकांत कर्पे, श्रीकांत राजाध्यक्ष, नाईक,शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर,वेंगुर्ला तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी,शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,शिरोडा युवा नेतृत्व संतोष धानजी,शिरोडा भाजप पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अशोक परब,बाबल गावडे,प्राजेश गावडे,दादा शेटये,बाळकृष्ण परब,दत्ताराम फटजी,विदयाधर धानजी,तुषार म्हाकले,दिपक नाटेकर,आरवली महिला पदाधिकारी रिमा मेस्त्री,आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव,आरवली सरपंच समीर कांबळी,आरवली ग्रामपंचायत सदस्य तातोबा कुडव त्याच प्रमाणे सदगुरु मलबारी,शिवा तारी,किरण तांडेल तसेच व्यापारी ,भाजप हिंतचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते.


