कशेडी घाटात दरड कोसळली… एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी/ प्रतिनिधी
पाऊस नसतानाही मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई व धामणदेवी गावच्या मध्यावर हॉटेल अन्नपूर्णा जवळ दरड कोसळून मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून तहसील व पोलीस प्रशासनामार्फत तळ कोकणात जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सदर घटना मंगळवार रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.


