सावंतवाडीत जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न
सिंधुदुर्ग / राजू तावडे
*जिल्हाक्रीडा कार्यालय ओरोस आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा उपरकर शूटिंग अकॅडमी, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडली. ही स्पर्धा दहा मीटर ओपन साईड दहा मीटर पिप साईट व 10 मिटर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली.यात जिल्हाभरातील शाळा व जुनिअर कॉलेज मधील नेमबाजांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी दोडामार्गचे माजी तहसीलदार श्री. अरुण खानोलकर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे सहाय्यक महसूल अधिकारी श्री. स्वप्नील प्रभू, नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अॅड. श्री. विक्रम भांगले, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती प्रविणा वानखेडे, उपरकर शूटिंग अकॅडमीचे एन.एस.एन.आय.एस प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज श्री. अतुल नाखरे उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटना दरम्यान श्री. विक्रम भांगले यांनी नेमबाजांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नेमबाजी हा केवळ खेळ नसून तो एकाग्रता, संयम आणि मानसिक संतुलनाचा खेळ आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच ऑलिम्पिक पर्यंत मजल मारू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच अध्यक्ष श्री. अरुण खानोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व आहे. नेमबाजीसारख्या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. पालकांनी आपल्या मुलांना अशा खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आणि सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक विजेते श्री. दत्तप्रसाद आजगावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेला


