न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबेनळी घाटात दरीत कार कोसळून साता-,यातील ८जणांचा मृत्यू

सातारा/

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या तरूणांची स्कार्पिओ कार आंबेनळी घाटात जवळपास 1 हजार फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 8 तरूण जागीच ठार झाले आहेत. रात्रीपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम तसेच प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

आंबेनळी घाटात स्कार्पिओ कार 1000 फूट दरीत कोसळून कारमधील सर्वच्या सर्व 8 तरूणांचा मृत्यू झाला आहे. मृत तरूण हे आसगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी होते. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20,), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 35 ) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) या तरुणांचा समावेश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे