न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

‘हव्वा….’ अग्नीखेळ….शंभर फुटी हुड्यावर चढणे… दगड फेक…… कुणकेरीचा आगळा हुडोत्सव ८ मार्चला

सिंधुदुर्ग/  साई सगम 

गोव्यासह कोंकणातील शिमगोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळा व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव रविवारी ८ मार्चला होत आहे. मात्र या हुडोत्सवाला खऱ्या अर्थाने शनिवारी ७ मार्चला दुपारपासुन प्रारंभ होणार आहे.

महाराष्ट्रात पंढरपूर नंतर कुणकेरी गावातच हुडोत्सव होत असुन १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.शनिवारी दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार असुन त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धुळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकुन ढोल ताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळी भोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.रविवार हुडोत्सवाचा मुख्य दिवस असुन या दिवशी सकाळ पासून भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार असून याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत . सायंकाळी ५ वाजता हुड्याजवळ घोडेमोडणी व लूटूपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी ६ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी हुडोत्सवाचा आणि श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे