श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. महेंद्र ठाकूर सेवानिवृत्त
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. महेंद्र ठाकूर सेवानिवृत्त
सावंतवाडी/ राजू तावडे
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी च्या फाउंडेशन कोर्स तथा पायाभूत अभ्यासक्रमाचे प्रा. महेंद्र ठाकूर हे 37वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सोमवारी सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयांमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत ,सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, स. का. पाटील महाविद्यालय मालवणचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर, सौ.सुखदा ठाकुर, सेवानिवृत्त प्रा. दिलीप गोडकर, सौ. नेहा ठाकूर, डॉ.चिन्मयी ठाकूर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनै उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले . प्रा.ठाकुर हे सकारात्मक विचार असलेले सतत उत्साही व आपल्याला सतत कामात व्यस्त ठेवणारे प्राध्यापक आहेत असे गौरवोद्गार काढले. संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत व सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत यांच्या हस्ते प्रा. महेंद्र ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ. नेहा ठाकूर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. बी. एन. हिरामणी, प्रा. डाॅ.सौ. प्रगती नाईक, प्रा. डॉ. एस. ए. देशमुख, प्रा. डॉ. एस. एम. बुवा, प्रा. डॉ.सौ. नीलम धुरी, प्रा. एम. बी. बर्गे. डॉ.एस.ए. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत यांनी प्रा.ठाकुर यांनी महावीद्यालयासाठी आजपर्यंत उत्तम काम केले व निवृत्तीनंतरही त्यांनी काॅलजसाठी काम करावे अशी इच्छा व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभाला उत्तर देताना प्रा. महेंद्र ठाकूर यांनी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी महाविद्यालयामध्ये अध्यापनासाठी दिलेली संधी व एकंदरीत केलेली मदत याबद्दल राजघराण्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली व आयुष्यभर आपण त्यांच्या ऋणात राहू अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी केले व आभार मानले.


