न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत भाजपच्या ‘सेवा अभियानाला’ प्रारंभ

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, या मुख्य उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान राबवले जात आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडत असून, यामध्ये स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आपल्या विविध मागण्या व समस्यांबाबत संबंधितांना निवेदने सादर करत आहेत.

सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभाग संयोजक व प्रदेश प्रवक्ते आमदार प्रमोद जठार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांची निवेदने स्वीकारली. नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कासचे सरपंच प्रविण पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, पंचायत समिती सदस्य महेश धुरी. बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे