न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळगांव रेडकरवाडी येथे शनिवारी श्री सत्यनारायण महापूजा

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

मळगांव रेडकरवाडी येथील श्री देव इशवटी देवस्थानची प्रतिवार्षिक श्री सत्यनारायण महापूजा शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापूजे निमित्त सर्वोत्तम सातार्डेकर कुटुंबियांच्या माध्यमातून दुपारी २ वाजता ‘श्री गजवक्र घुमट आरती मंडळ, म्हापसा यांची ‘घुमट आरती ‘ तसेच सायंकाळी ५ वाजता ‘स्वरधारा भक्तीनाट्य संगीत “प्रस्तुत मांद्रे, पेडणे गोवा येथील खास भजन सादर केले जाणार आहे. त्यानंतर स्थानिक भजन तसेच सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम व रात्री ९ वाजता सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरा,वेंगुर्ला यांचा ‘शेषात्मक लक्ष्मी नरसिंह’ हा पौराणिक पारंपारिक व दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रम व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे