पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त
बुलढाणा/
बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने देवळघाट येथे कारवाई करून 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप्त केले.
गुप्त माहितीच्या आधारे स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
या प्रकरणी चिखली येथील एका 59 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
.


