न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माणिक मोती” संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद

सावंतवाडी / राजू तावडे

विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त ”माणिक मोती” संगीत मैफिलीचे स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून आज रविवारी आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैफिलीचे उद्घाटन करण्यात आले. माणिक वर्मा यांनी गायलेल्या व अजरामर केलेल्या सदाबहार गीतांच्या नजराण्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शि.प्र. मंडळ, सावंतवाडी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, आतापर्यंत १४ पर्यटन महोत्सव सावंतवाडीत झालेत. त्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जायचे, त्यासाठी धोरणही निश्चित केले होते. नगरपरिषद ही लोकांना सुविधा देणारी संस्था असून बॅ. नाथ पै सभागृह स्थानिक कलावंतांना विनामोबदला उपलब्ध करून द्यावे. तसेच न.प. च्या संयुक्त विद्यमाने कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी श्री. साळगावकर यांनी केली. दरम्यान, कोकणच्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. स्थानिक कलावंतांना न.प. च्या नाथ पै सभागृहासह राजवाड्याच्या दरबार हॉलचीही दार उघडी राहतील, असे अभिवचन नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांनी यावेळी दिले.
तदनंतर पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार नजराणा सादर करण्यात आला. राग भटीयारसह विजय पताका, चांदण्या रात्रीतले, कौसल्येचा राम, त्या सावळ्या तनुचे, त्या चित्त चोरट्याला, मला मदन भासे हा, जाळी मंदी पिकली करवंद, घननिळा लडीवाळा, अमृताहूनी गोड आदी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधीता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रृती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर, सानिका सासोलकर यांनी ही गीते सादर केली. तर साथसंगत निरज भोसले, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री, भास्कर मेस्त्री यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी तर ध्वनी संयोजन स्मितेश पंडीत यांनी केले. मैफिलीच्या निमित्ताने सादरकर्त्या कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.‌
यावेळी सदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, अभिनव संगीत विद्यालयाचे संचालक किरण सिद्धये, सुरश्री संगीत वर्ग संचालिका मंजिरी धोपेश्वरकर, रघुकूल स्वर विहार संचालिका नुतन परब, सोमा सावंत, संजय कात्रे, प्रतिष्ठानच्या मंगल भोसले, मानसी भोसले, प्राजक्ता भोसले, नमिता भोसले, अनिल भोसले, अण्णा देसाई, निरज भोसले, विनायक गांवस आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रदीप शेवडे, रवींद्र गांवकर, शैलेश पै, गोविंद मळगावकर, सर्वेश राऊळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे