न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी च्या वतीने एक दिवशीय फणस प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा

सिंधुदुर्ग/

बुधवार  20 मे 2026 रोजी घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने एक दिवसीय फणस प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे . महिलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भरपूर प्रमाणात उपलब्धता , कमीत कमी किमतीमध्ये उपलब्धता, उत्कृष्ट चव ,कोकणात सहज उपलब्ध असा कोकणी मेवा म्हणजे फणस . कोकणात घरोघरी अगदी सहज उपलब्ध असलेल्या फणसापासून विविध स्वादिष्ट पदार्थ कसे बनवायचे याचे प्रशिक्षण खास महिला वर्गासाठी घे भरारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे . अनेक नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी सतत राबवीत असते त्यातीलच हा महिलांसाठी आणि गृहिणींसाठी अतिशय उपयोगी असा उपक्रम आहे.. या प्रशिक्षणामध्ये फणस बिर्याणी , फणस कटलेट, फणस जॅम , फणस खीर, फणस पकोडे, फणसाचे लोणचे ,पापड असे अनेक चविष्ट आणि उपयुक्त पदार्थ बनविण्यास शिकवले जातील प्रॅक्टिकल आणि डेमो दाखवले जातील. हे प्रशिक्षण सकाळी 9.30 ला सुरू होईल आणि 4.30 ला संपेल .प्रशिक्षणामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे . सदर प्रशिक्षण मँगो हॉटेल, सावंतवाडी या ठिकाणी घेण्यात येईल..सदर प्रशिक्षणाची फी प्रत्येकी फक्त 350 /- रुपये आहे .तरी जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षण मर्यादित सीट साठी असल्यामुळे लवकरात लवकर आपले नाव खालील नंबर वर बुक करावे आणि आपली एन्ट्री फायनल* *करावी. असे आवाहन घे भरारीच्या संस्थापिका अध्यक्षा मोहिनी मडगावकर आणि अध्यक्षा रेखा कुमटेकर यांनी केलेले आहे* *संपर्कासाठी मोबाईल नंबर… सलोनी वंजारी 9422 58 48 94 स्वप्नाली कारेकर. 9420077615..*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे