न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

समान काम, समान वेतनासाठी दुय्यम न्यायालयीन कर्मचारी आक्रमक….१६ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन

सिंधुदुर्ग / राजू तावडे

‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. गेल्या १८ महिन्यांपासून पाठपुरावा करूनही शासनाकडून निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यातील जिल्हा व दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबतचा हा प्रश्न सध्या आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा काळ्या फिती लावून निषेध, तर १६ व १७ ऑक्टोबर रोजी दोन दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी वसुबारसच्या दिवशी सर्व कर्मचारी एक दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत.
तरीही शासनाने १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयांतील कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी पत्राद्वारे दिला आहे.
या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे