धाराशिव जिल्ह्यात ४०० शाळा मोडकळीस
धाराशिव/ वृत्तसंस्था
धाराशिव जिल्ह्यामध्ये १०८६ जिल्हा परिषद शाळेपैकी ६९०शाळा ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या. जिल्ह्यात पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या जीर्ण शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. सुमारे ४०० शाळा मोडकळीस आल्याची बाब समोर, तसेच, अतिवृष्टीमुळे १३७ शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी छत गळती, भिंतींना तडे, वर्गखोल्यांची पडझड. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागत आहे शिक्षण पुनर्बांधणीसाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी शिक्षक, पालक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.


