भिवंडीत १४ जणांना अन्नाची विषबाधा…
कल्याण/ प्रतिनिधी
भिवंडी शहरातील खांडूपाडा परिसरात चिकन शाओर्मा (शो रमा), पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ६ सदस्यांसह एकूण १४ जणांना अन्नातून विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी खांडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ नावाच्या दुकानातून चिकन शाओर्मा आणि पिझ्झा खरेदी करून गुरुवारी रात्री घरी नेऊन खाल्ला होता. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासूनच काहींना अस्वस्थ वाटू लागले.त्यांना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


