न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप…

मुंबई/ वृत्तसंस्था

मुंबईतील बेस्ट  कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मुंबईतील बस सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने तातडीने अत्यावश्यक सेवा कायदा लागू करत या संपावर बंदी घातली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा.

कंत्राटीकरण आणि पीपीपी (PPP) तत्त्वावर बेस्टच्या मालमत्तांचा पुनर्विकास करण्यास कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

वेटलिस्टवरील कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करून घेण्यात यावे.

बेस्ट मधील १०,००० रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी त्वरित अदा करण्यात यावीत.

सरकारने संपावर बंदी घातली असली, तरी कर्मचारी आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे