न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

“सांग विठुराया कधी येशील खेळाया” …  आनंद शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांची दिंडी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

   सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या विणा सप्ताहादरम्यान आज मंगळवारी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिकेतील लहान मुलांची विशेष आषाढी एकादशी दिंडी काढण्यात आली. टाळ-घोषाच्या गजरात व वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांनी या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुलांवर शिक्षणासोबतच संस्कार घडवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “सांग विठुराया कधी येशील खेळाया, चिमुकली दिंडी माझी निघाली भेटाया…” अशा अभंग-घोषात वाजत-गाजत ही दिंडी काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.

या सोहळ्यात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, शाळेच्या शिक्षिका सौ. प्राजक्ता वेंगुर्लेकर, सौ. सुचिता वारंग, सौ. विभा पै, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच विठ्ठल मंदिर समितीचे स्थानिक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे