नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत अशोक चव्हाणांचाच डंका.. २३पैकी २१ जागा काबीज
नांदेड/ वृत्तसंस्था
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणूकीचा
निकाल जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने २३ पैकी तब्बल २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अशोक चव्हाण यांचा दबदबा असला तरी घराणेशाहीचा कित्ता मात्र राजकीय नेत्यांनी कायम ठेवल्याचे पहायला मिळाले. बिनविरोध निवडून आलेल्या आणि निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांमध्ये बहुतांश जण आजी माजी आमदार व त्यांचे सुपुत्र, पत्नी आणि खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सत्ता मिळणासाठी सत्ताधिकारी आणि विरोधक यांनी मतभेद दूर करून एकत्र आल्याचे देखील या निवडणुकीत पहायला मिळाले. मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची कामधेनू मानली जाते मात्र, राजकीय नेत्यांचे वर्चस्व त्यातच घराणेशाही कायम असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


