न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रायगडात कुंडलिका,सावित्री, आंबा नदी इशारा पातळीवर… महाड,रोहा, नागोठणेत पुराचा धोका

रायगड/ प्रतिनिधी

आंबा नदी इशारा पातळी 8 मीटर आहे, पण सध्या 8.20 मीटर वरून वाहत आहे

कुंडलिका आणि सावित्री नद्यांनीही धोका पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली

महाड, रोहा आणि नागोठणे परिसराला पूराचा धोका निर्माण झाला आहे. नदी किनाऱ्यावरील सखल भागात पूराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे

नागोठणे एसटी स्टँड परिसर व छत्रपती शिवाजी महाराज परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अंबा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता बंद केला आहे

रायगड जिल्ह्यात, विशेषतः रोहा परिसरात, पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस राहणार आहे.

नदी काठच्या गाव आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

.नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश दिले आहेत

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे