न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हा ‘मधुभाई’ आईमुळे घडला….. मधु मंगेश कर्णिकांची रत्नागिरीतील भावनिक मुलाखत

रत्नागिरी/ संतोष मुळीक 

रत्नागिरीचे माझ्यावर खूप उपकार आहेत. इथे मी आलो.. मी काही चांगला विद्यार्थी नव्हतो… पण ठिक शिकलो… पोटापाण्यासाठी जास्त शिक्षण घेतलं नाही… माझ्या उनाडापणामुळे आई तणावात होती… पण आई १४ वर्षांचा असताना वारली पण त्या आधी माझी पहिली कविता छापून आली. ती मी दाखवली.. आईने खूप मोठा लेखक हो.. असा आशिर्वाद दिला.. त्यानंतर ती गेली… तिच्या आशिर्वादाने मी यश संपादन केले.

साहित्यिकांमध्ये निवडणूका लावू नका असे मी वारंवार सांगत होतो. मी कोकणचा… पण पहिला आशिर्वाद कुसुमाग्रजांचा आला.पु.लं.नी आशिर्वाद दिला… त्यावेळी फक्त महाराष्ट्रातच साहित्य नव्हते देशभरातून मी निवडून आलो… माझ्या कोंकणात फक्त दोन मतं होती… तेव्हा मला कोंकणातील साहित्य परिषदेची उणीव जाणवली.आणि आतापर्यंत आपण इतरांच्या पालख्या उचलल्या या वेळी आपणच आपली पालखी उचलावी म्हणून कोंकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली…असा कोमसपच्या जन्माचा उलगडा मधुभाईंनी अशोक बागवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

कोंकणात साहित्यीक मात्र साहित्याक कोंकण कुठे हा प्रश्न मला सतत पडायचा.. कादंबरीत सर्वच समावेश करू शकत नाही… तर आत्मचरित्रात आपली कैफियत मांडता येते ती मी मांडली.. मी उनाड मुलगा.. आईला सतत चिंता असायची… आई वारली ती मी १४ वर्षांचा असताना…पण त्या आधी माझी कविता प्रसिद्ध झाली ती मी आईला दाखवली .. त्यावेळी आई आनंदी झाली आणि खूप मोठा लेखक हो …असा आशिर्वाद दिला.. आणि आई गेली..‌ आज मी जो काही आहे तो आईमुळेच… असं सांगत मधु भाई भूतकाळात जात साने गुरुजींच्या भेटी विषयी सांगितले… त्यांनी मी शिक्षणात जेमतेम असल्याने शेवटी बसायचो… माझ्या डोक्यात लेखक म्हणजे राजबिंडा .. मला लेखकाला बघायची खूप इच्छा होती.. शाळेत साने गुरुजी येणार म्हणजे लेखक येणार या  कौतुकापोटी लेखकाची वाट पाहत खाली बसलो… साने गुरुजी आले.. निव्वळ साधे … माझ्या तोंडी अचानक शब्द फुटले…’ अरे हे लेखक?’

साने गुरुजी आपल्या आईची गोष्ट सांगत होते.. ती मी माझ्या आईला समोर ठेवून ऐकत होतो… कार्यक्रम संपला सगळे गेले मी तसाच बसून राहिलो.. तेव्हा साने गुरुजी जवळ येत डोक्यावर हात ठेवून तु मोठा लेखक होशिल असा आशिर्वाद दिला… घरी जाऊन मी हि गोष्ट आईला सांगितली…आई आनंदली… माझ्या आयुष्यात तो  क्षण भावूक ठरला.

मला अपयश कधी आले नाही…पण सार्वजनिक ठिकाणी काम करताना मी मंत्रालयात असताना.. गावात कारखाना काढण्याचा प्रयत्न केला.. आणि सरकारकडे दिला… मात्र सरकारने तो बुडविला… असे सांगून शाळेतील प्रवासाचा उलगडा केला.आम्ही चार भावंडं १२ किमी. चालत कणकवलीत जात असो… तसं मी नंतर ठरवलं.. आपण शिकलोय …तसं आपल्या गावातील मुलं शिकू नये म्हणून मी गावात शाळा काढली…

सध्याच्या भाषेबाबत खंत व्यक्त केली… मुर्त्या बघितल्या… पाणी पिलो.. हे मराठी शुद्धीकरण करण शासनाने करावे असे त्यांनी मंत्री उदय सामंत यांना सांगितले.

कुसुमाग्रजांच्या स्मारकाची कथा.. नाय पै.. मराठी अभिजात भाषा…यांच्या संबंधित घडलेल्या गोष्टींचा उहापोह करीत मधुभाईंनी उपस्थित साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केले ..

 

 

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे