न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशकात जूना वाडा कोसळून एक भाविक जखमी

नाशिक/

नाशिक येथील ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरालगत असलेला एक जुना वाडा अचानक कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत मंदिरात दर्शनासाठी आलेला एक भाविक जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महापालिका प्रशासनाने वेळेवर हा धोकादायक वाडा पाडला नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा थेट आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे कपालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक जुन्या आणि धोकादायक वाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे