भंडा-यातील पिंपरीचिंचोलीला चक्रिवादळाचा तडाखा… प्रचंड नुकसान
भंडारा/
भंडारा जिल्ह्यातील जुनी पिंपरी-चिंचोली परिसरात आज दुपारी आलेल्या भीषण चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, घरांवरील पत्रे आणि छपरे अक्षरशः हवेत उडाली. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. परिसरातील अनेक विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक हवालदिल झाले असून, प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि बाधित कुटुंबांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.”


