न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गणेशचतुर्थी पूर्वी आंबा काजू नुकसान नोंदणी पूर्वीप्रमाणे करून द्यावी, शिवसेना शिष्टमंडळाची मागणी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

      गणेशचतुर्थी सणापूर्वी आंबा काजू नुकसान भरपाई आणि पीक पाहणी नोंदणी पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने भेट घेऊन सावंतवाडी तहसीलदारांना श्री. श्रीधर पाटील यांना निवेदन सादर केले.

शासन स्थरावरून आंबा, काजू पीक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र ती गणेश चतुर्थी पूर्वी मिळावी.अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच शासनाने पीक पाहणी नोंदणी करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र पीक पाहणी नोंदणी सहाय्यक यांच्याकडून नोंदणी वेळेवर होत नाही आणि होणार देखिल नाही. तसेच पीक नोंदणीची मुदत संपल्यावर त्या नोंदी होणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी पूर्वीप्रमाणेच पीक नोंदणी ही तलाठी यांच्या जवळच देण्यात यावी यासाठी बुधवारी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. तहसीलदारांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.

यावेळी माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, व्ही. जे. एन. टी. अध्यक्ष आनंद वरक, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजेश जाधव, तालुका संघटक संजय गावडे, विभाग प्रमुख संजय माजगावकर, युवा तालुकाप्रमुख प्रशांत जाधव, सचिव विश्वास घाग, उप विभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, ओबीसी उपतालुका प्रमुख लक्ष्मण भालेकर, सावंतवाडी उपतालुका प्रमुख राकेश पवार, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर, एकनाथ गावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे