पंतप्रधानांचे काटकसरीचे आवाहन… पेट्रोल, डिझेल,गॅस वाढीचे संकेत
नवी दिल्ली/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोना काळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिका आणि इस्राइलने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराणविरोधात सुरु केलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखातातून होणाऱ्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. तसेच त्याची झळ आता भारताला बसू लागली आहे.
त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोना काळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


