नवी मुंबईत कामोठेत स्लॅब कोसळून एक ठार एक जखमी
नवी मुंबई/ रत्नाकर प्रभू
नवी मुंबई सह ,मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडल्या. तर जोरदार पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. तर काही नुकसानीच्या घटना घडल्या, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. नवी मुंबईतील कोमोठे येथे इमारतीच्या एका प्लॅटचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
कामोठे सेक्टर १० मधील साई सिद्धी सोसायटीत घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून ३९ वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची १२ वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


